Health News : मुलांसाठी साखर धोकादायक आहे का? मुलांच्या आहारातील साखरेचे प्रमाण कसे नियंत्रित कराल?
डॉक्टर किंवा तज्ञ साखरेबद्दल आणि साखरेच्या वापराशी संबंधित समस्यांबद्दल चर्चा करतात, तेव्हा ते फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या साखरेचे सेवन टाळण्याचा सल्ला न देता अतिरिक्त साखरेचे सेवन बंद करण्याचा सल्ला देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखादा पदार्थ तयार करताना, त्यावर प्रक्रिया करताना त्यात साखरेचा वापर करणे म्हणजेच अतिरिक्त साखर होय. यामध्ये मध, मॅपल सिरप आणि फळांचा रस यासारख्या आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करणे योग्य राहिल.
दोन वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांनी दररोज 25 ग्रॅमपेक्षा कमी साखरेचे सेवन केले पाहिजे. दररोज सहा टेबलस्पून पेक्षा कमी साखरेचे सेवन करावे. दोन वर्षाखालील मुलांना मात्र अतिरिक्त साखर देऊ नये.
खरंतर, फळे आणि भाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये देखील साखर असते. मात्र तज्ज्ञ आपल्याला 'अॅडेड शुगर' कमी करण्याचा सल्ला देतात. ज्यामध्ये कृत्रिम साखरेचा समावेश असतो
मिठाईशिवाय उत्सव साजरा करा. साखरेस पौष्टिक पर्यायी पदार्थ शोधा. ताज्या फळांचा वापर करा.
भरपूर पाणी प्या आणि तुमच्या मुलांनाही तेच करायला सांगा. यामुळे तुमच्या रक्तप्रवाहावर साखरेचा होणारा परिणाम कमी होईल आणि मुलांकडून साखरेचे सेवन देखील कमी होईल.
तुम्ही तुमच्या मुलांना काय खायला देताय याकडे लक्ष द्या. चिंता करु नका किंवा घाबरुन जाऊन साखरचे सेवन पूर्णतः बंद करु नका.
खाण्याच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मुलाशी कसे वागता यावर या त्याचा परिणाम होऊ शकतो याची जाणीव ठेवा.