Hair Care Tips : पांढरे केस तोडल्याने काळे केसही पांढरे होतात? खरं की खोटं? चला आज जाणून घेऊयात
अवेळी कोणतीही गोष्ट घडल्यास ती डोळ्यांत लगेच खटकते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला वयाच्या आधीच तुमच्या केसांवर (Hair Care Tips) पांढरे केस दिसू लागले तर नजर पटकन तिथेच जाते. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकजण पांढरे केस दिसताच त्यांना तोडून टाकतात. यामुळे त्यांना एक समाधान देखील मिळतं. (Photo credit: Unsplash)
पण, सर्वात गमतीशीर गोष्ट म्हणजे अनेकदा आपण लोकांना हे बोलताना ऐकलं असेल की पांढरे केस तोडल्याने त्यावर पांढरे केस फार वेगाने येऊ लागतात. (Photo credit: Unsplash)
हे ऐकल्यानंतर प्रत्येकालाच पांढरे केस तोडल्यानंतर लगेच केस पांढरे होतात का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. (Photo credit: Unsplash)
आता या गोष्टीमध्ये कितपत सत्य आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. (Photo credit: Unsplash)
डॉक्टरांच्या मते, वयाच्या आधी केस पांढरे होणे हे तुमची अस्वस्थ जीवनशैली, पोटात साफ न होणे आणि इतर कारणांमुळे तुमचे केस पांढरे होतात. (Photo credit: Unsplash)
अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या केसांत फॉलिकल्स असतात आणि केस याच फॉलिक्लसमध्ये वाढू लागतात. (Photo credit: Unsplash)
केसांच्या फॉलिकल्समध्ये मेलेनोसाईट्स असतात जे मेलेनिन तयार करण्याचं कार्य करतात. केसांच्या रंगांमध्ये मेलेनिन सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. (Photo credit: Unsplash)
केसांचा रंग नैसर्गिकरित्या टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामागे इतर अनेक कारणं असू शकतात. (Photo credit: Unsplash)
जसे की, वाढतं वय, अयोग्य आहार, तणाव, चिंता, केमिकलचा जास्त वापर ही करणे असु शकतात (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo credit: Unsplash)