Health Tips : तुमचा सकाळच्या वेळी घसा खवखवतोय तर सावधान!

पावसाळा संपून हळूहळू थंडीचे दिवस सुरु होत आहेत. या बदलत्या हवामानात घसा खवखवणे (Sore Throat) आणि घसा दुखणे यांसारख्या समस्या सामान्य आहेत. (Photo Credit :Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पावसाळा आणि हिवाळ्यात अनेकांना सर्दी आणि घशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यावर आपण अनेक घरगुती उपाय देखील करू शकतो. (Photo Credit :Pixabay)

तुम्हाला जर वारंवार घसादुखीचा त्रास होत असेल तर ही छोटीशी बाब समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यावर वेळीच उपचार करा. (Photo Credit :Pixabay)
एखाद्या व्यक्तीचा सतत घसा दुखत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण, ही फुफ्फुस आणि इतर फुफ्फुसांमध्ये संसर्गाशी संबंधित समस्या असू शकते. (Photo Credit :Pixabay)
तुम्हाला व्हायरल फ्लू किंवा सर्दी आहे आणि तुम्हाला खाण्यात किंवा गिळताना त्रास होत आहे. यावर औषधं घेऊनही तुम्हाला फरक जाणवत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे तुमच्या शरीरासाठी धोक्याचे लक्षण आहे. (Photo Credit :Pixabay)
विषाणूजन्य सर्दी एक ते तीन दिवसात बरी होते. पण जर तुमचा घसा दुखत नसेल आणि तुमचा आवाज कर्कश असेल तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. (Photo Credit :Pixabay)
घसा खवखवणे हलक्यात घेऊ नका कारण ही परिस्थिती कधीही गंभीर होऊ शकते. याचाच अर्थ तुम्हाला तुम्ही काही वेळातच अशक्तपणा जाणवेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा. (Photo Credit :Pixabay)
जर तुमचा घसा खवखवत असेल तर गरम पाणी, काढा, दूध हळद या सारखे घरगुती पाय करा. (Photo Credit :Pixabay)
घरगुती उपाय करून, औषधे घेऊन पण जर तुमचा घास दुखत असेल सर्दी जात नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा कारण हे तुमच्या शरीरासाठी घटक आहे. (Photo Credit :Pixabay)
जर तुम्हाला 2 किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त वेळ घसा खवखवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लक्षणांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर यातून अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.(Photo Credit :Pixabay)