Massage Benefits : मालिश करण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा! होतील फायदे...
मसाजचे अर्थातच मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार शरीराला मालिश केल्याने अनेक फायदे होतात. प्रौढ असो वा लहान, मालिशला विशेष महत्त्व आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात अंगदुखी सुरू होते त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचे असते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी मालिश खूप महत्त्वाचा आहे. [Photo Credit : Pexel.com]
मसाज केल्याने स्नायू वेदना कमी होतात. त्याच वेळी, चिंता, तणाव आणि नैराश्य देखील कमी होऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
मालिश केल्याने शरीराचा थकवाही दूर होतो. आणि झोपही चांगली लागते. बीपी नियंत्रित ठेवण्यासोबतच झोपेसाठीही ते उत्तम आहे. [Photo Credit : Pexel.com]
आंघोळीपूर्वी तेलाने मालिश : हिवाळ्यात आंघोळीपूर्वी मालिश केल्यास शरीरात उष्णता निर्माण होते. असे केल्याने तुम्हाला थंडी जाणवणार नाही. यामुळे शरीरातील टॉक्सिन्सही निघून जातात आणि घाणही निघून जाते. [Photo Credit : Pexel.com]
आंघोळीनंतर तूप वापरावे : आंघोळीनंतर तुपाने अंगाला मालिश करा. एक चमचा तूप घेऊन शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर लावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल. [Photo Credit : Pexel.com]
याशिवाय शरीराला चांगला वास येईल आणि चेहऱ्याची चमक वाढेल. आंघोळीनंतर तेल लावल्यास चिकटपणा जाणवतो. [Photo Credit : Pexel.com]
रात्री मालिश पद्धत : हिवाळ्यात, रात्री मालिश केल्यानंतर, आपण आरामात कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. रात्री तुपाने शरीराला मालिश केल्यास तूप त्वचेवर स्थिर होईल. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. म्हणुन तेलाने मालिश करा. [Photo Credit : Pexel.com]
सामान्य पाण्याने आंघोळ : आंघोळीच्या अर्धा तास आधी मालिश करा आणि मगच आंघोळ करा. आंघोळीसाठी साधे पाणी वापरावे. थंड पाण्याचे नाही. सामान्य पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]