Masoor dal Benefits: प्रोटीनचा मुबलत स्त्रोत मसूर डाळ, जाणून घ्या 6 आरोग्यदायी फायदे
मसूर डाळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात. ज्यामुळे स्नायू आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त मसूर डाळीचे अनेकही फायदे असतात. (Photo - Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमसूर डाळीचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. मसूर डाळीच्या सेवनानं कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते. (Photo - Freepik)
रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मसूर डाळीचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातो. यासोबतच अशक्तपणाची समस्या दूर करण्यासाठी मसूर डाळ गुणकारी ठरते. (Photo - Freepik)
मधुमेहींसाठी मसूर डाळ फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते. (Photo - Freepik)
वजन कमी करण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा आधार घेतो. पण तुम्हाला माहितीये का? मसूरची डाळ वजन कमी करण्यासाठी मदत करते. मसूर डाळीचे नियमित सेवन केल्यानं शरीराचं वजन कमी होते. त्यात कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. (Photo - Freepik)
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मसूर डाळ गुणकारी ठरते. यातील पोषक तत्वांमुळे पोटाच्या समस्यांवर सहज मात करणं शक्य होतं. (Photo - Freepik)
हृदयाच आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मसूर डाळ फायदेशीर ठरते. त्यासोबतच कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरही नियंत्रणात ठेवते. (Photo - Freepik)