Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Benefits of Orange peels : संत्र्याची साल वापरुन चेहऱ्याच्या 'या' समस्या दूर करा!
संत्री या फळाचे आपल्याला अनेक फायदे होतात यसाहितच संत्र्याचे साल देखील सौंदर्यासाठी उपयोगी ठरते . या सालीचा कशाप्रकारे उपयोग करता येईल हे येथे सांगणार आहोत . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचा टॅनिंग होणे म्हणजेच त्वचा काळी पडणे ही एक सामान्य समस्या आहे . संत्र्याचा वापर केल्याने टॅनिंग कमी होऊन रंग पूर्वीसारखा होतो . [Photo Credit : Pexel.com]
टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर , चिमूटभर हळद , चंदन पावडर आणि काही थेंब मध मिसळून पेस्ट बनवा . [Photo Credit : Pexel.com]
पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि एक मिनिट हलक्या हाताने चोळा आणि पाच मिनिटे राहू द्या, नंतर पाण्याने धुवा . [Photo Credit : Pexel.com]
संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते , तर मध त्वचेला उजळ करते . [Photo Credit : Pexel.com]
तुम्ही चेहऱ्यावर संत्र्याची साल देखील चोळू शकता. टॅनिंगचे परिणाम कमी करण्यासाठी हे नियमितपणे करा. [Photo Credit : Pexel.com]
संत्र्याच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. [Photo Credit : Pexel.com]
बर्फाच्या ट्रेमध्ये संत्र्याचा रस गोठवू शकता आणि नंतर ताज्या लूकसाठी हे आईस क्युब चेहऱ्यावर लावू शकता. [Photo Credit : Pexel.com]
तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दैनंदिनी वापरात संत्र्याच्या सालीचा समावेश करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
मुरुम, डार्क सर्कल, कोरडी त्वचा यासारख्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते . या साली वापरून तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक बनवू शकता. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]