मोठी बातमी! तब्बल 6000 कोटी रुपयांचा आयपीओ येणार, मालामाल होण्याची 'ही' संधी सोडू नका!
Bhavish Aggarwal: गेल्या काही दिवसांपासून ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) या आयपीओची चर्चा होत आहे. भविष अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांच्या नेतृत्त्वातील कंपनीच्या आयपीओची अँकर बुकिंग 1 ऑगस्टपासून खुली होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा आयपीओ 2 ते 6 ऑगस्ट या काळासाठी गुंतवणुकीसाठी खुला राहील. 9 ऑगस्ट रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.
या आयपीओनंतर शेअर बाजारावर सूचिबद्ध होणारी ओला इलेक्ट्रिकल ही इलेक्ट्रिक व्हेइकल कंपन्यांच्या श्रेणीतील पहिली कंपनी असेल.
हा आयपीओ साधारण 6000 कोटी रुपयांचा असेल असे सांगितले जात आहे.
आयपीओतून उभ्या झालेल्या रकमेतून 1,226 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरले जातील.
800 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. तर 1600 कोटी रुपये संशोधन आणि विकासावर खर्च केले जातील.
350 कोटी रुपये भविष्यातील वेगवेगळ्या योजनांवर खर्च केले जातील. ओला इलेक्ट्रिक या कंपनीने गेल्या वर्षभरात साधारण 3200 कोटी रुपयांची फंडिंग मिळवलेली आहे. या कंपनीचा कारखाना तामिळनाडूत आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)