children height not increasing : मुलांची उंची वाढत नसेल तर जाणून घ्या कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता आहे.
मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांची उंची न वाढणे ही सर्वसाधारण समस्या आहे.मुले या समस्यमुळे अनेक वेळा आई वडील काळजीत असतात की त्यांच्या मुलांची उंची ही त्यांच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत एवढी कमी का वाढते. (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत मुलांची उंची न वाढण्यामागे कोणकोणत्या उणिवा असू शकतात हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. (Photo Credit : Unsplash)
तज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांमध्ये सर्वात मोठी कमतरता म्हणजे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची असते. हे घटक हाडे आणि स्नायूंसाठी खूप महत्वाचे असतात.(Photo Credit : Unsplash)
व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुलांचा शारीरिक विकास योग्य प्रकारे होत नाही. विशेषतः उंची वाढण्यात अडथळे येतात. या दोन जीवनसत्त्वांबद्दल आणि त्यांच्या कमतरतेवर मात कशी करायवी. या बद्दल जाणून घ्या.(Photo Credit : Unsplash)
व्हिटॅमिन डी हे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व आहे जे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते. तसेच हाडे आणि दातांसाठी हे खूप फायदेशीर आहे.(Photo Credit : Unsplash)
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हाडांवर होतो.(Photo Credit : Unsplash)
हाडांचा विकास नीट न झाल्यास मुलांच्या उंचीवरही परिणाम होऊ शकतो. शरीरात ‘डी’ जीवनसत्त्व कमी असल्याने मुलांची हाडे पुरेशी मजबूत होत नाहीत.(Photo Credit : Unsplash)
मुलांच्या शरिरात व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू नये यासाठी मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी ने समृद्ध असलेला आहार देणे खूप महत्वाचे असते. (Photo Credit : Unsplash)
कॅल्शियम हे एक खनिज आहे जे हाडे आणि दातांसाठी खूप महत्वाचे असते. बालपणात मुलांची हाडे आणि दात खूप वेगाने विकसित होत असतात. त्यामुळे या काळात कॅल्शिअमची नितांत गरज असते. जेवणात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास मुलांच्या शरीरात कमतरता निर्माण होऊ शकते.(Photo Credit : Unsplash)
काही मुलांची उंची वाढण्यात अनेक समस्या येतात. अशा समस्या टाळण्यासाठी मुलांना कॅल्शियम युक्त आहार देणे अत्यंत आवश्यक असते.(Photo Credit : Unsplash)