तुमच्या मुलांनाही आहे का माती खाण्याची सवय? मग हे उपाय तुमच्या कामी येतील...

माती खाण्याची सवय लहान मुलांच्या आरोग्याकरिता घातक ठरू शकते. या सवयीमुळे मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. ही सवय सुटावी याकरिता मुलांचे आई वडील अनेक उपाय अवलंबताना दिसतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माती खाणे मुलांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजार होऊ शकतात. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता.

दररोज मुलांना केळ आणि मध एकत्र करुन द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल.
रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना पाण्यासोबत ओव्याचे चुर्ण द्या. यामुळेही मुलांची माती खाण्याची सवय दूर होईल.
मुलांची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंग बारीक करून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर एक चमचा लवंग पावडर पाण्यासोबत मुलांना खायला द्या.
मुलांच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.