Harmful Side effects from plastic bottles : तुम्ही ही प्लास्टिक बाटलीत पाणी पिता का? प्लास्टिक बाटली देते अनेक आजारांना आमंत्रण
आजकाल कुठेही जाताना प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. लोक बिंधास बाजारातून पाणी विकत घेऊन ते पितात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण सर्वांनाच माहितीये की प्लास्टिक पर्यावरण आणि आरोग्याला हानी पोहोचवते. अशा स्थितीत तुम्ही ज्या पाण्याच्या बाटलीतून पितायेत ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. वास्तविक, प्रत्येक प्रकारच्या प्लास्टिकमध्ये घातक रसायने आणि जीवाणू हे आढळत.(Photo Credit : Pixabay)
जेव्हा तुम्ही या बाटल्या वापरतात तेव्हा त्या मार्फत अनेक किटाणू तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्याचे गंभीर परिणाम.(Photo Credit : Pixabay)
प्लास्टिक हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोराईडपासून बनते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापैकी बीपीए हे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात हानिकारक रसायन आहे.(Photo Credit : Pixabay)
जेव्हा पाणी जास्त काळ उच्च तापमानात ठेवले जाते तेव्हा त्याची पातळी अनेक पटींनी वाढते, ज्यामुळे आरोग्यास गंभीर हानी होऊ शकते.(Photo Credit : Pixabay)
अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की पॉली कार्बोनेट प्लास्टिक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे बिस्फेनॉल ए हे रसायन पॉली कार्बोनेटच्या बाटल्यांमधून पाणी पिणाऱ्या लोकांच्या मूत्रात आढळून आले आहे. जेव्हा त्याचे प्रमाण वाढते तेव्हा हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो.(Photo Credit : Pixabay)
प्लास्टिकच्या बाटल्यांच्या वापराबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा प्लास्टिकची पाण्याची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती सूक्ष्म प्लास्टिक पाण्यात सोडू लागते.(Photo Credit : Pixabay)
हे सूक्ष्म प्लास्टिक कण शरीरात अनेक प्रकारच्या समस्यांना जन्म देऊ शकतात. त्याच्या अति प्रमाणात हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व आणि यकृत संबंधित रोगांचा धोका वाढू शकतो.(Photo Credit : Pixabay)
जर तुम्ही प्लास्टिकची बाटली जास्त काळ ठेवली आणि ती वापरत राहिले तर त्यामुळे अनेक हार्मोनल विकारांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.(Photo Credit : Pixabay)
तज्ज्ञांच्या मते, जर प्लास्टिकच्या बाटल्या जास्त काळ वापरल्या गेल्या तर पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. तसेच मुलींमध्ये लवकर यौवन होण्याची शक्यता असते. बाटलीबंद पाण्याच्या वापरामुळे यकृत आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.(Photo Credit : Pixabay)