Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Walking Barefoot : अनवाणी पायाने चालण्याचे फायदे
आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो. दररोज किमान अर्धा ते एक तास चालण्यामुळे त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनवाणी पायाने चालण्याने शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते.
गवतावर अनवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते. मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे.
आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
जर तुम्ही सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालायला सुरुवात केली तर तुम्हाला सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने आपल्या शरीराचा संपूर्ण दबाव पायांच्या बोटावर पडतो. पायांच्या बोटावर प्रेशर पडल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
सकाळी अनवाणी पायांनी फिरणे म्हणजे पायांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे पाय आणि गुडघे यांचे स्नायू मोकळे होतात आणि पायांना आराम मिळतो.