तुम्हालाही जोरात घोरायची सवय आहे? मग हे नक्की वाचा
आजकाल पती-पत्नीमध्ये घोरण्यामुळे घटस्फोट होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझोपताना तुम्हीही जोरात घोरत असाल तर काळजी घ्या. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, घोरणे हे मृत्यूचे देखील कारण ठरु शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घोरण्यामुळे केवळ आरोग्यावरच नाही तर तुमच्या कौटुंबिक जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो.
पण तुमचं घोरणं कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात हे जाणून घेऊया.
एका अभ्यासानुसार, एकट्या अमेरिकेत झोपेच्या घटस्फोटाच्या घटनांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्लीप डिव्होर्स म्हणजे पती-पत्नी एकत्र नसून वेगळे झोपणे. आजकाल घोरण्यामुळे नवरा-बायको एकत्र राहतात पण वेगळे झोपतात. असं समोर आलं आहे.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की घोरणारा प्रत्येक चौथा व्यक्ती स्लीप एपनियाचा बळी ठरत आहे.
जास्त घोरण्यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि हायपरटेन्शनसह मधुमेह देखील होऊ शकतो.
यासाठी जर तुम्ही नियमित योगा केला तर तुमच्या घोरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
त्यासाठी तुम्ही रोज योगासनं करणं देखील फायदेशीर ठरु शकतं.