Rice water for hair: केसांसाठी उपयुक्त तांदळाचे पाणी; केसांना लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
हिवाळ्याच्या काळात थंडीचे प्रमाण वाढते. हवेतील आर्द्रतेमुळे आपले केस निर्जीव आणि कोरडे होतात. थंडीमुळे लोकांना खूप आळसही येतो, त्यामुळे लोक केस धुण्यास कंटाळा करतात . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे केस खराब होतात. जर तुम्हालाही तुमच्या केसांचा कोरडेपणा दूर व्हावा आणि ते चमकावे असे वाटत असेल तर तांदळाचे पाणी वापरणे सुरू करा . [Photo Credit : Pexel.com]
तांदूळ केसांसाठी फायदेशीर आहे . तांदळाचे पाणी बहुतेकदा त्वचा आणि केसांची काळजी घेण्याच्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. [Photo Credit : Pexel.com]
तांदळाच्या पाण्यात फेरुलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात , तुमच्या आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे . [Photo Credit : Pexel.com]
तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल नावाचे कार्बोहायड्रेट आढळते, जे केसांची चमक तर वाढवतेच, शिवाय वाढ आणि मजबुतीसाठीही मदत करते .[Photo Credit : Pexel.com]
असे बनवा तांदळाचे पाणी :एका भांड्यात पांढरे तांदूळ घ्या. त्यात जास्त प्रमाणात पाणी आणि संत्र्याची काही साले घाला. यानंतर मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ अर्धा कच्चा झाल्यावर हे पाणी गाळून घ्या. [Photo Credit : Pexel.com]
त्यानंतर कोमट असताना हे पाणी केसांना लावा. 30 मिनिटे राहू द्या. यानंतर, आपले केस चांगले धुवा आणि 10-15 मिनिटे सोडा. यानंतर पाण्याने आणि शैम्पूने केस स्वच्छ धुवा. [Photo Credit : Pexel.com]
तांदळाच्या पाण्याचा नियमित वापराने केसांची चमक वाढते आणि टाळूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे केसांची निगा राखणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये याचा समावेश केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
तांदळाच्या पाण्यात बरेच अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतात. हे पाणी केसांना मजबूत करते, ज्यामुळे सतत केस गळणे थांबते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]