रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लवकर मृत्यू होण्याचा धोका
दररोज किमान सात ते आठ तास झोपणं गरजेच आहे. पण रात्री लवकर झोपणंही (Sleeping Habits) आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक वेळा दिवसभरातील कामाचा थकवा आल्यानंतरही आपल्या झोप लागत नाही. तर काही जण मोबाईलवर टाइमपास करत वेळ घालवतात, यामुळे झोपायला उशीर होतो. पण ही सव घातक ठरू शकते.
फिनलंडमध्ये झालेल्या एका संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे.
या संशोधनाच्या अहवालानुसार, जे लोक दिवसा जागे असतात त्यांच्या तुलनेत रात्री जागणाऱ्या लोकांचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते.
फिनलंडमध्ये केलेल्या या संशोधनात असे समोर आले आहे. रात्री जागे राहणारे लोक दिवसा जागे राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त दारू आणि तंबाखूचे सेवन करतात. त्यामुळे याचं व्यसन जडते.
संशोधनानुसार, रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांना दारू आणि तंबाखू यांसारख्या चुकीच्या गोष्टींचं व्यसन लागते.
इतकंच नाही तर या वाईट सवयींमुळे लवकर मृत्यू होण्याची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते, असंही संशोधनाच्या अहवालात समोर आहे.
क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशनलमध्ये या संबंधित संशोधनाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनामध्ये 1981 ते 2018 दरम्यान 24,000 जुळ्या मुलांच्या आरोग्यावर करण्यात आले.
1981 ते 2018 या 37 वर्षांच्या कालावधीत 8,728 मृत्यूची नोंद झाली. त्यावरून असे दिसून आले की, रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांचा मृत्यू रात्री लवकर झोपलेल्या लोकांपेक्षा आधी झाल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
संशोधकांनी दावा केला आहे की, जे लोक उशिरा झोपतात त्यांच्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन उशिरा सोडलं जातं. आपल्या मेंदूमधून झोपेसाठी आवश्यक मेलाटोनिन हार्मोन तयार केलं जातं. हे हार्मोन झोपेला प्रवृत्त कर. मेलाटोनिन हार्मोन उशिरा सोडलं गेल्यामुळे झोप उशिरा येते. यामुळे ते सकाळी उशिरा उठतात आणि त्यांच्या दिनचर्येवरही परिणाम होतो.