Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितला उत्तम व्यायाम; जाणून घ्या!
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हल्ली जितकी मेहनत घेतली जाते तितकी कोणत्याच बाबतीत घेतली जात नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात दीक्षितांनी सांगितलेली स्वास्थ्यशैली जनमानसात लोकप्रिय झाली असून अनेक जणांनी त्याचं अनुकरण सुरु केलं आहे.
जाणून घेऊया डॉ. दिक्षितांनी सांगितल्याप्रमाणे वजन कमी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते व्यायाम फायदेशीर ठरू शकतात.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉ. दीक्षित म्हणतात चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे.
दररोज 45 मिनिटात साडेचार किलोमीटर चालणे हा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे.
चालण्याला पर्याय म्हणून तुम्ही पोहणे अथवा सायकलींगचाही अवलंब करू शकता.
पण 45 मिनिटे पूर्ण आणि सलग चालणं गरजेचं आहे.
डॉ. दीक्षित सांगतात चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यात पहिले 20-25 मिनिटे तुमच्या शरीरातील ग्लुकोज बर्न होते आणि त्यांनतर फॅट लॉस व्हायला मदत होते.
यासोबत तुम्ही योगासनं, दोरीच्या उड्या या व्यायाम प्रकारांचा अधिक व्यायाम करण्यासाठी वापर करू शकता. उत्तम आहार, योग्य डायट प्लॅन आणि त्यासोबत व्यायाम तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)