Junk Food Disadvantages : तुम्हीही रोज जंक फुड खाताय? मग हे जाणून घ्या
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत:कडे निट लक्ष देत नाही. सकाळी उठल्यापासून आपले रुटीन सुरु होते. ते अगदी रात्री झोपेपर्यंत आपण अविरत काम करतो. यावेळेत अगदी समोर येईल ते खाल्ले जाते.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेषत: आपले फास्ट फूडकडे (Fast Food / Junk Food) जास्त लक्ष असते. आपले पोट भरण्याबरोबरच जंक फूड खाण्याची अनेक कारणे आहेत. एक तर फास्ट फूड आपल्याला सहज उपलब्ध होते, झटपट तयार होते आणि मुख्य म्हणजे याची चवही खूप मस्त असते.(Photo Credit : Pixabay)
जंक फूड खाण्याचे अनेक तोटेही आहेत. फास्टफूड खूप अनहेल्दी असते. हेल्दी फूड खाण्यापेक्षा जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अपाय होऊ शकतात. (Photo Credit : Pixabay)
आपण अनेकदा ठरवतो की वारंवार जंक फूड खाणे टाळले पाहीजे पण आपल्याला सवय लागलेली असल्यामुळे ते सहज शक्य होतेच असे नाही. (Photo Credit : Pixabay)
जेव्हा आपण पुन्हा पुन्हा शिजवलेले अन्न खायचे टाळतो तेव्हा मूड बदलणे एखादी गोष्ट खायची वारंवार इच्छा होणे काळजी वाटणे डोकेदुखी आणि झोप कमी होणे यासारखी मनोवैज्ञानिक आणि शारिरीक लक्षणे दिसतात. (Photo Credit : Pixabay)
हीच लक्षणे जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट किंवा एखादे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा दिसतात. संशोधनातून असेही आढळले आहे की जंक फूड कमी करण्याच्या दिवसांमधील 2 ते 5 दिवस ही लक्षणे तीव्र होतात. (Photo Credit : Pixabay)
जे अन्न दीर्घकाळ खाण्यासाठी संरक्षित केले जाते त्याला प्रोसेस्ड फूड असे म्हणतात. यामध्ये फ्लेवर्स आणि रंगांचा वापर केला जातो. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होवू शकतात. (Photo Credit : Pixabay)
प्रोसेस्ड फूडमध्ये पोषणमूल्य नसतात. जेव्हा शरीराला गरजेची पोषणतत्व मिळत नाहीत. तेव्हा आपली विचारांची क्षमता खुंटते. म्हणूनच जंक फूड प्रोसेस्ड फूड न खाण्याचा सल्ला दिला आतो. (Photo Credit : Pixabay)
हे पदार्थ तयार करताना यामध्ये फ्लेवर्स आणि रंगांचा वापर केला जातो यामुळे आपल्या त्वचेवर अॅलर्जीचे कारण होऊ शकते. अनेकदा ही अॅलर्जी इतकी जास्त असते की त्यावर उपाय करणे अवघड होऊन बसते. आपण अनेकदा बघतो की प्रोसेस्ड फूडमध्ये कोणत्य ना कोणत्या कृत्रिम रंगाचा वापर केलेला असतो. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)