Hydrating Foods : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात 'हे' पदार्थ; नक्की वापर करा

उन्हाळ्याच्या दिवसांत स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी पाणी तर गरजेचेच आहे. पण त्याचबरोबर असेही काही फळं आणि पदार्थ आहेत ज्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेटेड राहू शकता. असे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काकडी : तुमच्या आहारात काकडीचा समावेश करा. हा हायड्रेटिंगसाठी देखील एक चांगला पर्याय आहे. त्यात 95 टक्के पाणी असते. जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

पपई : पपईमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे शरीराला हायड्रेट ठेवते.
कांदा : कांदा उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात थंड करण्याचे गुणधर्म आहेत आणि तो उष्माघातापासूनही तुमचे संरक्षण करतो.
कलिंगड : उष्णतेवर मात करण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगडापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असते जे तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
टरबूज : टरबूजात 91 टक्के पाणी असते. त्यात व्हिटॅमिन बी 6, ई तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते.