कर्करोगाचा पराभव आता चौथ्या आणि शेवटच्या स्टेजवर करणं कसं शक्य झालं? यावर आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं काय?
कर्करोग (Cancer) नाव ऐकताच भल्याभल्यांना भीती वाटते. कर्करोग जर चौथ्या स्टेजला असेल तर व्यक्ती जास्त दिवस जगू शकत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, काही डॉक्टर्स आणि तज्ज्ञ हे योग्य मानत नाहीत. त्यांचा मते रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला पण पराभूत करू शकतो.
कर्करोगाच्या चार स्टेज आहेत, तर आपण त्याबद्दल जाणून घेऊयात...
पहिली आणि दुसरी स्टेज हा कर्करोगाची अगदी सुरुवात असते. यात रुग्णाला कर्करोग आहे की नाही? हे समजलं आणि वेळेवर उपचार सुरू झाल्यास इतर पेशींना हानी पोहोचत नाही.
कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये रुग्णाला तीव्र वेदना होतात, वजन कमी होतं आणि जिथे कर्करोग आहे, तिथे गाठ तयार होते.
चौथी ही सामान्यतः आजाराची शेवटची स्टेज समजली जाते. यात कर्करोग नसांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो आणि रुग्ण बरा होण्याची शक्यता कमी असते.
चौथ्या आणि शेवटच्या स्टेजमध्ये रुग्णाची अधिक काळजी घ्यावी लागते. कर्करोग शरीराच्या कोणत्या भागात आहे, रुग्णाची तब्येत आणि उपचारादरम्यान पेशी कर्करोगावर कशी प्रतिक्रिया देतात? यावर अवलंबून असतं.
चौथ्या स्टेजमध्ये रुग्णांची फार काळजी घ्यावी लागते. कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवणं, जी काही नवी लक्षणं असतील ती कमी करण्यासाठी अनेक ट्रिटमेंट रुग्णाला घ्याव्या लागतात.
चौथ्या स्टेजमध्ये टार्गेटेड थेरपी, केमोथेरपी, शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी हे उपचार करावे लागतात.
टीप: वरील माहिती केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.