तुम्हाला कोणी गुदगुल्या केल्यावर हसू येतं? पण सर्वांनाच येतं असं नाही, कधी विचार केलाय असं का होतं?
तुम्हाला गुदगुल्या होतात का? आता तुम्ही म्हणाल आता हे मध्येच काय विचारताय? आम्ही तुम्हाला हे विचारतोय कारण आज आम्ही तुम्हाला याचबाबत एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला एखादी व्यक्ती येऊन गुदगुल्या करते, तेव्हा नेमकं असं काय होतं की, आपल्याला हसू येतं? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? एवढंच नाहीतर आपल्यापैकी अनेकजण असेही आहेत, ज्यांना कितीही गुदगुल्या करा, त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यांना हसू येतच नाही. पण असं का होतं? गुदगुल्या केल्यानंतर हसू हा येतं? किंवा कधी हसूच येत नाही? का? याचा विचार केलाय तुम्ही कधी?
अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा आपल्या शरीरात कोणतीही हालचाल का होत नाही आणि आपल्याला हसूही येत नाही? त्याचवेळी जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं तुम्हाला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र आपण लगेच हसायला लागतो.
तुमच्या सर्व प्रश्नांमागे एक वैज्ञानिक कारण आहे. गुदगुल्या केल्यानंतर हसू येणं किंवा हसू न येणं हे पूर्णतः आपल्या शरीरातील काही घटकांवर अवलंबून असतं.
हसणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, गुदगुल्या केल्यावर हसण्यामार्फत दिलेली आपली प्रतिक्रिया ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, खरं तर, बरेचदा लोक आपल्याला न सांगता अचानक गुदगुल्या करतात, ज्यामुळे आपलं शरीर अचानाक सतर्क होतं, चिंताग्रस्त होऊ लागतं आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं.
याच वेळी आपलं शरीर प्रतिक्रिया देतं ती हसण्यामार्फत. याच कारणामुळे आपण अनियंत्रितपणे हसायला लागतो. समजा तुम्ही काहीतरी कामात आहात आणि अचानक कोणीतरी येऊन तुम्हाला गुदगुल्या करायला लागलं, तर तुम्ही क्षणभर घाबरता. त्यावेळी काय होतं हे शरीराला कळत नाही आणि मेंदू आपली प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
काहींना कुणीतरी गुदगुल्या करणार आहे हे कळलं तरी हसायला लागतात. म्हणजेच, गुदगुल्या करण्याची संपूर्ण प्रक्रिया आश्चर्यावर अवलंबून असते. जेव्हा कोणी आपल्याला अचानक गुदगुल्या करतं, त्यावेळी आपला मेंदू त्यासाठी तयार नसतो. अशा परिस्थितीत आपण स्वसंरक्षणासाठी हसायला लागतो.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या मेंदू शास्त्रज्ञाच्या हवाल्यानं HowStuffWorks.com या साईटनं सांगितलं आहे की, मेंदूचा सेरिबॅलम भाग आपल्याला गुदगुल्या करण्यापासून रोखण्याचं काम करतो.
सेरेबॅलम हा मेंदूचा एक भाग आहे, जो सर्व क्रियांवर, हालचालींवर लक्ष ठेवतो. मेंदूचा हा भाग आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या संवेदनांमध्ये फरक करण्यास मदत करतो. म्हणूनच जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा आपण हसत नाही.