Health Tips : लघवीचा रंग बदलणं हे किडनीच्या आजाराचं प्राथमिक लक्षण; कसे ते जाणून घ्या
मूत्रपिंड असो किंवा यकृत, ते आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव आहे. यकृत आपल्या शरीरातील कचरा काढून टाकण्याचे काम करते, तर किडनीचे काम आपल्या शरीरातील टाकाऊ भाग वेगळे करून शरीरातून बाहेर टाकण्याचे असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा किडनीत कोणत्याही प्रकारचे संक्रमण किंवा खराबी सुरू होते, तेव्हा ते शरीराला विविध प्रकारचे सिग्नल देते. मूत्रपिंडाच्या आजाराची सर्वात मोठी समस्या ही आहे की जोपर्यंत रोग जास्त पसरत नाही तोपर्यंत व्यक्तीला वेदना जाणवत नाही.
रक्त शुद्ध करणे आणि त्यातून विषारी पदार्थ काढून टाकणे, रक्तदाब नियंत्रित करणे, शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक संप्रेरकांची निर्मिती करणे, लघवीचे नियमन आणि फिल्टर करणे याशिवाय इतरही अनेक महत्त्वाची कार्ये किडनी करते.
निरोगी शरीरासाठी किडनी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा मूत्रपिंडात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होतो तेव्हा ते तुम्हाला काही खास संकेत देऊन सावध करतात. मूत्रपिंडाच्या आजाराशी संबंधित ही 5 चिन्हे ओळखा. कारण एकदा किडनीचा आजार बळावला की जीवालाही धोका निर्माण होतो.
साधारणपणे श्वासाची दुर्गंधी येण्याचे कारण म्हणजे कच्चा कांदा खाणे आणि दिवसभर शरीराच्या गरजेनुसार पाणी न पिणे. पण जर तुम्हाला सतत श्वासाची दुर्गंधी येत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण श्वासाची दुर्गंधी हे देखील किडनीच्या आजाराचे प्राथमिक लक्षण आहे.
मूत्रपिंडाच्या मुख्य कार्यांपैकी एक म्हणजे यूरिन फिल्टर करणे. जेव्हा किडनीमध्ये संसर्ग किंवा कोणताही रोग विकसित होत असतो तेव्हा त्याचा तुमच्या लघवीच्या रंगावरही परिणाम होतो आणि असे बदल दिसून येतात...
शरीरात लोह आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे थकवा येतो. म्हणूनच, सतत थकल्यासारखे वाटण्यामागील कारण जाणून घेण्यासाठी, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा रक्तात लाल पेशींची कमतरता निर्माण होते. या पेशी रक्तातील ऑक्सिजनची पातळी राखण्यात मोठी भूमिका बजावतात. रक्तात ऑक्सिजन कमी झाला की शरीराला थकवा जाणवू लागतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.