Health Tips : चालताना 'या' चुका करू नका, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
तुम्ही दररोज तर व्यायाम न करता फक्त चालण्याची सवय लावली तरी, तुम्हाला खूप फायदा होईल. एका संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज 30 ते 40 मिनिटे चालणे आवश्यक आहे. ( Image Source : istockphoto )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही पावले चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असून यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. निरोगी राहण्यासाठी लोक मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) जातात किंवा काही लोक संध्याकाळी वॉकला (Evening Walk) जातात. ( Image Source : istockphoto )
चालण्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चालत असाल किंवा चालताना काही चुका झाल्या तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. ( Image Source : istockphoto )
जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालत असाल तर जाणून घ्या की चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? वॉक करताना तुम्ही कोणती चूक करता आणि त्यामध्ये कोणत्या सुधारणा करता येतील. ( Image Source : istockphoto )
जर तुम्ही दररोज 30 ते 40 मिनिटे चालत असाल तर तुमचा वेग ताशी 6.5 किमी असावा. ( Image Source : istockphoto )
तुमचे शरीर आणि वजनानुसार तुम्ही सामान्य गतीने चालू शकता, पण वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर जलद चालण्याची सवय लावा. ( Image Source : istockphoto )
चालताना अनेकदा लोक नकळत हाताची मूठ घट्ट बंद करतात. चालताना बंद केल्याने त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. ( Image Source : istockphoto )
मूठ घट्ट बंद करुन चालल्याने शरीरावर दबाव निर्माण होतो आणि याचा हात, खांदे आणि मानेवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो. ( Image Source : istockphoto )
बोटांमध्ये सूज आणि वेदना जाणवू शकतात. म्हणूनच चालताना मूठ बंद करू नका. ( Image Source : istockphoto )
चालताना हाताची मूठ उघडी ठेवून चाला. दोन्ही हातांची बोटे थोडीशी आतील बाजूला वाकवा आणि तर्जनीवर अंगठ्याला विश्रांती देऊन चाला. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते. ( Image Source : istockphoto )
छाती सरळ ठेवून, खांदे खाली आणि पाठ ताठ ठेवून चाला. चालताना हात कोपरात 90 अंशांवर वाकवावेत. ( Image Source : istockphoto )