Health Tips: डाळिंब खाल्ल्याने शरीराला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे; अनेक आजार राहतील दूर
डाळिंब रक्तदाब संतुलित करते. दोन आठवडे दररोज 150 मिली डाळिंबाच्या रसाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवजन नियंत्रणात ठेवण्यास डाळिंब उपयुक्त आहे. डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ देत नाहीत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डाळिंब फायदेशीर आहे.
तरुण राहायचे असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा, हा एक अँटी-एजिंगचा उत्तम स्रोत आहे.
डाळिंबात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देखील असतं जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
डाळिंब सांधेदुखीपासून बचाव करते, तसेच पचनक्रिया व्यवस्थित ठेवते.
गर्भवती महिलांसाठी डाळिंबाचे सेवन खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही. डाळिंबमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, फ्लोरिक अॅसिड हे गर्भवती महिलांच्या पोटात वाढणाऱ्या मुलांसाठी फायदेशीर मानले जाते.
ज्या पुरुषांना शारीरिक कमजोरी, थकवा आदी समस्या आहेत, त्यांच्यासाठी डाळिंबाचं सेवन फायदेशीर आहे. त्यामुळे पुरुषांनी रोज एक डाळिंब खावं.