Kolhapur News: थेट पाईपलाईनमुळे कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, काळ्ळमावाडीत धरणात सतेज पाटलांकडून जलपूजन
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि कोल्हापूरचे दीर्घकाळ स्वप्न असेल्या थेट पाईपलाईन योजनेमधील मैलाचा टप्पा पार झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदमदार पावसामुळे काळम्मावाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या थेट पाईलपाईलन योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले आहे
काळम्मावाडी धरणातून पाणी जॅकवेलमध्ये पोहोचल्याने आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांनी मान्यवरांसह योजनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्याचे माझे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी योजनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर सतेज पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
येत्या दोन महिन्यांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण होताच योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन कोल्हापूला कायमस्वरूपी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
योजनेच्या पूर्ततेमुळे आत्मिक समाधान लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, कोल्हापुरात पुईखडीपर्यंतची पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे.
दुसऱ्या बाजूने वीजवाहिन्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. तर जॅकवेलवरील पंप हाऊसचे काम पूर्णत्वाला जात आहे.
उपसा पंप जोडण्यासाठी तयारी सुरू आहे.