Improve Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्याची सोपी पद्धत, 'या' फळांचा डाएटमध्ये करा समावेश

शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्त कमी होते आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. लोह कमी झाल्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी कमी होऊ लागतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काही फळांची मदत होते.

दररोज डाळिंब फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाच्या सेवनाने रक्ताची वाढ होते आणि अॅनिमियाची समस्या कमी होते.
हिमोग्लोबिन कमी असल्यास पालकाच्या भाजीचा आहारात नक्कीच समावेश करा.
पालकामध्ये लोह तसेच कॅल्शियम, सोडियम, प्रथिने आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.
मोसमात पेरू जरूर खाल्ले पाहिजे. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट फायदेशीर ठरेल. बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.
दररोज अंडी खाणेही फायदेशीर ठरू शकते. रोज अंडी खाल्ल्याने व्हिटॅमिन डी आणि लोहाची कमतरता दूर होते.
लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी काजू नक्कीच खा. मनुके भिजवून खाल्ल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करता येते.