Dharmendra Bday Special: फक्त ५१ रुपये मानधनापासून सुरवात ते बॉलीवूडचा सुपरस्टार; जाणून धर्मेंद्र बद्दलच्या या खास गोष्टी!
8 डिसेंबर 1935 रोजी जन्मलेली हीमन धर्मेंद्र आज आपला 88 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
या चित्रपटात त्यांना फक्त 51 रुपये साइनिंग अमाउंट मिळाले. यानंतर त्यांना सतत अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.
'अॅक्शन हीरो' असण्यासोबत धर्मेंद्र रोमॅंटिक सिनेमाचा बादशहा होते.
त्यांचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होते.
त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाही रंगल्या होत्या. 'धर्मेंद्र' यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल (Dharam Singh Deol) असे आहे. पण ते 'धर्मेंद्र' याच नावाने परिचित आहेत.
धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत 1960 मध्ये पदार्पण केले. जवळपास सहा दशकांपासून धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी जवळपास 250 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
धर्मेंद्र यांनी 1966 मध्ये रिलीज झालेल्या 'फूल और पत्थर' या चित्रपटातून अॅक्शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.
यातच 'शोले' हा बॉलीवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे.
धर्मेंद्र हे बॉलिवूडमध्ये सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते.
1960 च्या दशकात 'आयी मिलन की बेला', काजल, फूल और पत्थर, आये दिन बहार के यासारख्या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्यांना लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्यांनी नंतरच्या वर्षांत मोठे स्टारडम मिळवले.
आंखे, शिकार, आया सावन झूम के, जीवन मृत्यु, तुम हसीन में जवान, शराफत, मेरा गाव मेरा देश, सीता और गीता, समाधी, राजा जानी, जुगनु, यादों की बारात, कहानी किस्मत की, लोफर, दोस्त, शोले, प्रतिज्ञा, चरस, धरम वीर, चाचा भतिजा, राम बलराम, काटिलों के काटिल, गज़ब, नौकर बीवी का, गुलामी, इन्सानियत के दुश्मन, लोहा, हुकुमत, आग ही आग, एलान-ए-जंग आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. बंदिनी, हकिकत, अनुपमा, सत्यकाम आणि चुपके चुपके या चित्रपटातील भूमिकाही गाजली.
1997 मध्ये त्यांना बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानासाठी फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.