Health Tips | आहाराच्या सवयींमध्ये आजपासूनच करा मशरुमचा समावेश; फायदे जाणून व्हाल थक्क
Health Tips काही भाज्यांचे प्रकार अद्यापही फार सराईतपणे वापरात आणले जात नाहीत. पण, मुळात या भाज्या फार गुणकारी असतात ही बाबही नाकारता येणार नाही. हिवाळ्याच्या दिवासांमध्ये सर्वत्र अशीच एकभाजी नजरेस पडते. हल्ली तर, वर्षाच्या बाराही महिने ही भाजी बाजारांमध्ये उपलब्ध असते. ही भाजी म्हणजे मशरुमची.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमशरुममध्ये असणाऱ्या अनेक गुणविषेषांपैकी आणखी एक म्हणजे यामध्ये असणारं व्हिटॅमिन डीची मात्रा. हाडं मजबूत ठेवण्यासाठी याचा फार फायदा होतो. तर, क्रिमिनी, पोर्टेबेला, शिटेक आणि सफेद बटन मशरूम यांच्या मदतीनं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलटं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं. त्यामुळं रक्तदाब आणि हृदयरोगांपासून सहज दूर राहता येतं.
अमिनो आम्ल, अँटीबायोटीक अशी अनेक तत्त्व आणि गुणधर्मांनी परिपूर्ण मशरुन शरीरातील रोगप्रिकारक शक्ती वाढवतो. ज्यामुळं अनेक आजारांपासून दूर राहणं सहज शक्य होतं. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळातही मशरुमचं सेवन फायद्याचं ठरत आहे.
वजन घटवण्यासाठी आणि एक परिपूर्ण आहार म्हणून मशरुमकडे पाहिलं जातं. स्थूलता कमी करण्यासाठी अनेकदा आहारांच्या सवयींमध्ये याचा समावेश केला जातो.
मशरुममध्ये असणारं अँटी इनफ्लेमेटरी आणि बीटा ग्लूकॉन तत्व शरीराला कॅन्सरच्या धोक्यापासून दूर ठेवतात. उपयुक्त फॅट्सचं प्रमाण जास्त असून, यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते.
अनेक व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडेंट आणि अमिनो आम्लांचे गुणधर्म असणारा हा इवलासा दिसणारा मशरुम शरीरासाठी बराच उपयुक्त आहे. रोजच्या आहाराच्या सवयींमध्ये त्याचा समावेश करणं केव्हाही उत्तम. मशरुम हा त्याची चवीसाठी ओळखला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -