IN PHOTOS | येळकोट येळकोट जय मल्हार! खंडेरायाचरणी संभाजी राजे सपत्नीक नतमस्तक

1/14
सानथोर, अबालवृद्ध असा प्रत्येकजण इथं येऊन खंडेरायाचरणी आपल्या व्यथा मांडतो आणि जीवानाच्या या प्रवासात अडचणींवर मात करण्यासाठी त्याच्याकडून बळ मिळवतो.
2/14
येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट; असं म्हणत मंदिराबाहेर भंडाराही उधळला.
3/14
संभाजी राजेंनी सर्वांच्याच भेटीला आणलेल्या या छायाचित्रांतून काही कारणास्तव जेजुरीपर्यंत जाऊ न शकणाऱ्या अनेकांनाच खंडेरायाचं दर्शन होत आहे असं म्हणायला हरकत नाही. (सर्व छायाचित्रं- Yuvraj Sambhajiraje Chhatrapati )
4/14
लॉकडाऊन काळात जेजुरी गडावरही लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळं मंदिरात प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. पण, नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर अनेक भाविकांनी सोन्याच्या जेजुरीची वाट धरली.
5/14
शिवाय जेजुरीच्या या गडावर त्यांनी खंडोबाची तळीही भरली.
6/14
खंडा तलवार उचलून त्यांनी खंडोबाचरणी श्रद्धासमुनं अर्पण केली.
7/14
मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांकडून यावेळी संभाजी राजे आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत करत या भेटीसाठी त्यांना आठवण भेटही देण्यात आली.
8/14
खंडेराया म्हणजे महाराष्ट्राचं आणि छत्रपती घराण्याचंही श्रध्दास्थान असंही त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
9/14
लग्नाच्या 25व्या वाढदिवसानंतर संभाजी राजेंनी जेजुरी गडाला भेट दिल्याचं पाहायला मिळालं.
10/14
संभाजी राजे यांच्या पत्नी, युवराज्ञी संयोगीताराजे यासुद्धा यावेळी त्यांच्यासोबत होत्या.
11/14
अशा या जेजुरी गडधीशाचरणी नुकतीच खासदार, छत्रपती संभाजी राजे यांनी भेट दिली.
12/14
फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी या खास क्षणांची छायाचित्र पोस्ट करत सर्वांना याबाबतची माहिती दिली.
13/14
यावेळी त्यांनी खंडेरायाची विधीवत पूजा केली.
14/14
अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी असंख्य भाविक येत असतात.
Sponsored Links by Taboola