Health Tips : मायग्रेनचा त्रासापासून मुक्तता हवीये तर या गोष्टींची घ्या काळजी
मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना अनेकदा तीव्र डोकेदुखी असते आणि जेव्हा तणाव वाढतो किंवा झोपेची पद्धत बिघडते तेव्हा वेदना आणखी वाढू शकते. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाशिवाय, जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा या वातावरणातील बदलाचा परिणाम तुमच्या मेंदूवर होऊन तुम्हाला मायग्रेनचा त्रास देखील होऊ शकतो. (Photo Credit : unsplash)
हिवाळ्यात तापमान कमी होताच, मायग्रेनची समस्या लक्षणीय वाढू शकते आणि त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामकाजावरही होऊ लागतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी हिवाळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.(Photo Credit : unsplash)
मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो अनेक कारणांमुळे होऊ शकतो. हवामानातील बदल हे मायग्रेनच्या वेदना वाढण्याचे एक सामान्य कारण आहे. तसेच, त्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलू शकतात.(Photo Credit : unsplash)
तूर्तास, आपण हंगामी किंवा हिवाळ्याच्या महिन्यांत मायग्रेनच्या वेदनांपासून कसे सुरक्षित राहू शकतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo Credit : unsplash)
हवामानातील बदलामुळे झोपेच्या वेळाही बदलू शकतात. ज्यामुळे मायग्रेन होऊ शकतो. म्हणून, झोपेचे वेळापत्रक योग्य ठेवा आणि दररोज किमान 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या. (Photo Credit : unsplash)
निर्जलीकरण हे देखील एक सामान्य कारण आहे ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्यात लोक अनेकदा पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात. (Photo Credit : unsplash)
पण, तुमच्या या सवयीमुळे तुमचं नुकसान होते. मायग्रेनचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे. (Photo Credit : unsplash)
हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर थेट सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करा. जर तुम्ही कॉम्प्युटरवर सतत काम करत असाल तर थोड्या वेळाने ब्रेक घ्या आणि स्क्रीन टाईम कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.(Photo Credit : unsplash)
ऋतूतील बदलामुळे मायग्रेनच्या ट्रिगरमुळे तुमची दैनंदिन दिनचर्या प्रभावित होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणत्या ऋतूमध्ये मायग्रेनचा त्रास जास्त होतो हे कळू शकेल. याच्या मदतीने तुम्ही औषधांसह तुमचे दैनंदिन वेळापत्रक सांभाळू शकाल.(Photo Credit : unsplash)