सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक, नवीन संशोधनात धक्कादायक बाब उघड
Plastic Bottle is Harmful : पाणी हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यातच आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणरणत्या उन्हात बाहेर पडताना प्रत्येक जण स्वत: जवळ एक पाण्याची बाटली नक्की ठेवतो. मुलंही शाळेत जाताना पाण्याची बाटली सोबत घ्यायला विसरत नाहीत.
अनेकदा लोक फ्रीजमध्येही प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून ठेवतात. जर प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पित असाल, तर तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनात नुसार, तुम्ही दररोज ज्या बाटलीतून पाणी पितात त्यात टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात.
अमेरिकेतील वॉटर प्युरिफायर आणि ट्रीटमेंट कंपनी वॉटरफिल्टरगुरू (waterfilterguru) ने रियुजेबल (Reuseble) पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटल्यांवर एक चाचणी केली.
ज्यामध्ये या बाटल्यांच्या सर्व भागांची तीन वेळा चाचणी करण्यात आली आणि त्यात ग्राम निगेटिव्ह रॉड आणि बॅसिलससारखे बॅक्टेरिया असल्याचं आढळून आलं.
हे जीवाणू इतके धोकादायक आहेत की ते तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांना बळी पडू शकतात.
हा जीवाणू देखील जखमा, न्यूमोनिया आणि सर्जिकल साइटच्या संसर्गाचं मुख्य कारण आहे.
या बॅक्टेरियामुळे होणाऱ्या रोगांवर प्रतिजैविकांचाही फारसा परिणाम होत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.