30 Push-Ups a Day : घरच्या घरीच दिवसाला फक्त 30 पुश-अप केल्यास शरीरात किती बदल होतो माहीत आहे का?
30 पुश-अपच्या नित्यक्रमाने काय फायदा होईल हे जाणून घेऊया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका महिन्यासाठी दिवसातून 30 पुश-अप केल्याने तुमची ताकद वेगाने सुधारेल.
अप्पर-बॉडी स्ट्रेंथ मिळते. तसेच जेव्हा तुम्ही तुमचे शरीर जमिनीवरून उचलता तेव्हा तुमचे हात प्रत्यक्ष धक्का देतात, असे करताना ते स्नायू अॅक्टिव्ह करतात.
तुमच्या बायसेप्स आणि ट्रायसेप्स व्यतिरिक्त, यात तुमचे खांदे आणि छातीचे स्नायू समाविष्ट आहेत
दिवसाला तीस पुश-अप तुमची छाती तयार करतील, स्नायू मजबूत होतील.
पुश-अप स्नायू तयार करण्यास आणि शरीराच्या वरच्या भागामध्ये ताकद सुधारण्यास मदत करते. छातीतील स्नायू (पेक्टोरलिस मेजर), हात (विशेषतः ट्रायसेप्स) आणि खांदे (विशेषतः स्कॅप्युलर स्थिर करणारे स्नायू) यांना टार्गेट करते.
जेव्हा तुम्ही पुश-अप करता तेव्हा संपूर्ण कोरमधील स्नायू देखील अॅक्टिव्ह असतात. जसजसे तुम्ही मजबूत होत जाल तसतसे तुम्ही अधिक अपग्रेड करून पुश-अपची तीव्रता देखील वाढवू शकता.
पुश-अपसाठी कोणत्याही विशेष उपकरणे, प्रशिक्षक किंवा अगदी जिमची आवश्यकता नसते. आपल्याला फक्त लहान जागा पुरेशी आहे.
जर तुमच्याकडे जिममध्ये जाण्यास जास्त वेळ नसेल, तर पुश-अप सारखे व्यायाम (लंग्ज, स्क्वॅट्स आणि इतर कंपाऊंड मूव्हसह) अत्यंत फायदेशीर आणि कार्यक्षम आहेत. कारण एकाच वेळी अनेक मोठे स्नायू काम करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.