Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : तुमच्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी 'या' सोप्या घरगुती उपायांचा करा वापर
शरीराची सूज अनेक कारणांमुळे असू शकते. यामुळे तुमचे शरीर खूप सुजलेले वाटते. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. चला जाणून घेऊया या सोप्या घरगुती उपायांबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीरातील सूज कमी करण्यासाठी रोज तुळशीची काही पाने चावा. यामुळे सूज कमी होईल. याशिवाय तुळशीचा चहाही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
सूज कमी करण्यासाठी, गरम पाण्यात सैंधव मीठ घाला. जर तुमचे संपूर्ण शरीर सुजले असेल तर अशा स्थितीत खारट पाण्याने आंघोळ करा. यामुळे खूप फायदा होईल.
जवसाच्या बिया जळजळ कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता. उदाहरणार्थ- जवसाचे पाणी, भाजलेली जवस, जवसाचा चहा या सगळ्याचा खूप चांगला उपयोग होईल.
शरीराची सूज कमी करण्यासाठी मोहरीचे तेल भागावर गरम करा, या तेलाने शरीराची मालिश केल्यास बराच फायदा मिळू शकतो.
जर तुम्हाला हात-पायांवर खूप सूज येत असेल तर अशा स्थितीत कोथिंबीरीचे पाणी प्या. त्यामुळे बराच दिलासा मिळेल.
शरीराची सूज कमी करण्यासाठी अन्नात खोबरेल तेलाचा वापर करावा. तसेच या तेलाने शरीराची मालिश करा. त्यामुळे बराच आराम मिळेल.