Health Care: ही आहेत जगातील सर्वात आरोग्यदायी 8 फळं, यादी बघितल्यावर तुम्हाला वाटेल हे आपणही खाऊ शकतो

ब्लॅकबेरी आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. ब्लॅकबेरितील घटक रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ब्लॅकबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्ट्रॉबेरी हे एक रसाळ, लाल फळ आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. स्ट्रॉबेरीमध्ये अनेक आरोग्यदायी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात अँथोसायनिन्स, फ्लेव्होनॉइड्स असतात जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. स्ट्रॉबेरीमधील फायबर आणि पोटॅशियम देखील हृदय निरोगी ठेवायला मदत करतात.

व्हिटॅमिन सीने समृद्ध स्त्रोतांपैकी संत्री हे एक फळ आहे. दिवसातून एक संत्री खाल्ल्याने व्हिटॅमिन सीची कमी पूर्ण होते. व्हिटॅमिन सी शरीरात एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. हे जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यासाठी देखील आवश्यक आहे.
लिंबू हे सायट्रस फळ आहे जे लोक पारंपारिक पाककृतींमध्ये वापरतात, कारण त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.लिंबाचा समावेश रोजच्या आहारात केल्याने आरोग्य सुधारते.
केळी त्यांच्या उच्च पोटॅशियम गुणधर्मांसाठी ओळखली जातात. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. ते ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहेत, एका केळीमध्ये 105 कॅलरीज आणि 26.95 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात.
डाळिंब हे एक सुपरफूड आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्सचे प्रमाण जास्त आहे, जे शरीरातील रोग निर्माण करणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करतात. त्यात फायबर देखील भरपूर आहे.
अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे... ही म्हण अगदी खरी आहे. सफरचंद खाऊन तुम्ही स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकता. सफरचंद सालीसकट खाल्ल्यास तुम्हाला अधिक फायदे होतील. सफरचंद खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच, सफरचंद वजन कमी करण्यास मदत करते, यामध्ये असलेले पेक्टिन आतड्यासाठी चांगले असते.
अननस आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे, त्यात ब्रोमेलेन नावाचे सक्रिय संयुग असते, ब्रोमेलेन नाकाची जळजळ किंवा सायनुसायटिस कमी करण्यास मदत करू शकते. अननसात मॅगनीज असते, ज्याचा वापर शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी होतो.