Health Care: 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये पपई; नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम
पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असते. यामुळेच हे खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपपई आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते, परंतु काही लोकांनी त्यांचे सेवन करणे नेहमी टाळावे. काही आजारांमध्ये पपई हे फळ खाणं त्रासाचं कारण बनू शकतं.
गर्भवती महिलेने चुकूनही पपई खाऊ नये, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण असे का म्हणतात याचा कधी विचार केला आहे का? वास्तविक, गरोदरपणात पपई खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका असतो. यामुळेच गर्भवती महिलांना नेहमी या फळापासून दूर राहण्यास सांगितलं जातं.
केवळ गरोदर स्त्रियाच नाही तर अतिसार, जुलाब आणि अन्या पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनीही पपईचं सेवन करू नये. कारण यामुळे त्यांचे आरोग्य आणखी बिघडू शकते.
ज्या लोकांना लेटेक्स अॅलर्जीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पपई खाणे हानिकारक ठरू शकते.
हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्यांनी पपई अजिबात खाऊ नये. मोठ्या प्रमाणात पपईचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
किडनी स्टोनची समस्या असल्यास पपई खाऊ नये. कारण, या फळामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीच्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोन होऊ शकतो.
पपई खाणं काही लोकांसाठी फायदेशीरही ठरू शकतं. पपईमध्ये असे पोषक तत्व असतात, जे आपली त्वचा उजाळण्यास मदत करतात.