Health Tips: टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी किंवा दूध पिणं योग्य की अयोग्य? पाहा तज्ज्ञ काय सांगतात...
टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, कारण त्याचा तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर वाईट परिणाम होतो. टरबूजमध्ये भरपूर फायबर, साखर आणि पाणी असतं. त्यामुळे त्यावर अजून पाणी पिऊ नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा तुम्ही टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पितात तेव्हा तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये सूक्ष्मजंतू पसरण्याची शक्यता वाढते. कोणतेही फळ खाल्ल्यानंतर एक तासानंतरच पाणी प्यावे, असे काही आरोग्यतज्ज्ञ सांगतात. टरबूज, स्ट्रॉबेरी, संत्री, खरबूज आणि काकडी यांसारख्या ज्या फळांमध्ये आधीपासून भरपूर पाणी असते त्यांच्यावर कधीही पाणी पिऊ नये.
टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोट फुगते, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. यामुळेच टरबूज खाल्ल्यानंतर कधीही पाण्याचं सेवन करू नये.
आयुर्वेदाने दूध आणि टरबूज यांचे मिश्रण हानिकारक असल्याचं म्हटलं आहे. जर तुम्ही टरबूज आणि दुधाचं एकत्र सेवन केलं किंवा हे दोन्ही मिसळून शेक बनवला आणि प्यायला तर तुम्ही आजारांना आमंत्रण देत आहात यात शंका नाही.
टरबूज आणि दूध हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहे. टरबूज स्वभावाने आंबट असते, तर दूध गोड असते. जर तुम्ही या दोघांचे एकत्र सेवन केले तर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवतील, शरीरात विषारी पदार्थ तयार होतील आणि जुलाब आणि उलट्यांचा त्रास होईल.