Per Day How Much Sugar : साखरेचे जास्त सेवन केल्यास आरोग्यावर 'हे' परिणाम होऊ शकतात; एका दिवसात किती साखर खाणे योग्य आहे ?
एखाद्या व्यक्तीने रोज किती साखर खावी हे पूर्णपणे तो रोज किती शारीरिक हालचाली करतो यावर अवलंबून असतो. साखर शरीरासाठी कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाही. असे तज्ज्ञाकडून सांगण्यात येते. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाखरेत कोणतेही चांगली पोषक तत्व नसतात. जास्त साखर खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. गरजेनुसार थोडी साखर खाऊ शकता. पण शक्यतो कमी प्रमाणात साखरेचे सेवन करण्याचा प्रयत्न करावा. (Photo Credit : Pixabay)
भारतात, बहुतेक लोक गोड खाण्याचे शौकीन आहेत. कोणताही सण असो किंवा समारंभ असो, मिठाई नक्कीच तयार केली जाते. पण जास्त साखर खाणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. (Photo Credit : Pixabay)
जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरात अनेक आजार निर्माण होतात. निरोगी राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीने दिवसभरात किती मिठाई खावी हे जाणून घ्या. भारतातील लोक जितके गोड खातात तितके जगात क्वचितच कोणी खात असेल. (Photo Credit : Pixabay)
लग्नापासून वाढदिवसाच्या पार्टी पर्यंत प्रत्येक कार्यक्रमात मिठाई नक्कीच तयार केली जाते. इतकेच नाही तर बहुतेक घरांमध्ये जेवणानंतर काहीतरी गोड खाल्ले जाते.(Photo Credit : Pixabay)
इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिनच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, भारतातील लोकांना साखरेचे व्यसन लागले आहे. जे धोकादायक आरोग्यासाठी ठरू शकते. (Photo Credit : Pixabay)
भारतात अन्नपदार्थांमध्ये साखरेचा वापर विक्रमी पातळीवर केला जातो जो अत्यंत धोकादायक आहे. भारतात दरवर्षी 80 टक्के मृत्यू हे मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकारामुळे होत असल्याचे समोर आले. हे आजार कोणत्या ना कोणत्या प्रकारे साखरेशी संबंधित आहेत.(Photo Credit : Pixabay)
निरोगी राहण्यासाठी तुम्ही एका दिवसात किती गोड खाऊ शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, WHO ने एका व्यक्तीला एका दिवसात 6 चमच्यापेक्षा जास्त मिठाई न खाण्याचा सल्ला दिला आहे. (Photo Credit : Pixabay)
असे केल्याने तुम्ही लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकता. तुमच्या आहारात नैसर्गिक साखर असलेल्या अशा गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न कराव.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)