Makar Sankranti 2024: मकरसंक्रांतीला गूळ-तीळ-खिचडी खाण्याचे आणि दान करण्याचे महत्त्व काय?
15 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल. हा सण कापणीचा आणि सूर्य-शनिशी संबंधित असल्याचे सनीतले जाते. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमकर संक्रांतीचा दिवस शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही चांगली कामे करून तुमचे नशीब बदलू शकतात. तसेच मकर संक्रांतीला उत्तरायण असेही म्हटले जाते, कारण यानंतर सूर्य उत्तर दिशेला जातो.(Photo Credit : Pixabay)
या दिवशी तिळा बरोबरच गूळ खाणे, खिचडी आणि दानधर्म करण्याचेही महत्त्व आहे. या तीन गोष्टींशिवाय मकर संक्रांतीचा सण अपूर्ण आहे, असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गूळ आणि खिचडीचे सेवन आणि दान करण्याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊया.(Photo Credit : Pixabay)
असे म्हटले जाते की मकरसंक्रांतीला खिचडीचे सेवन कारल्याने नवग्रहाचा आशीर्वाद मिळतो आणि आरोग्याचाही वरदान मिळते. तसेच खिचडीमध्ये जोडलेले पदार्थ नऊ ग्रहांशी संबंधित असल्याचे शास्त्रात सांगितले आहे.(Photo Credit : Pixabay)
तांदूळ - खिचडीमध्ये तांदूळ महत्त्वाचा आहे जो चंद्र आणि शुक्राची शुभ प्राप्ती करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. तसेच तुपाशिवाय खिचडी अपूर्ण मानली जाते. सूर्याचा संबंध तुपाशी आहे. यामुळे सूर्याची कृपा प्राप्त होते. त्याच बरोबर हळद गुरूचे प्रतिनिधित्व करते. असे म्हंटले जाते. आणि खिचडीमध्ये काळ्या मसूराचे सेवन केल्याने शनि, राहू व केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो. अशी मान्यता आहे. (Photo Credit : Pixabay)
मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक लोक मूग डाळ, हिरव्या भाज्या आणि तांदूळ यांच्या मिश्रणाने खिचडी बनवतात. मूग डाळ आणि हिरव्या भाज्या बुधाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तसेच खिचडीसोबत खाल्लेला गूळ हे मंगळ आणि सूर्याचे प्रतीक मानले जाते.(Photo Credit : Pixabay)
मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गूळ किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होते. काळे तीळ शनिशी संबंधित आहेत आणि गूळ हे सूर्याचे प्रतीक असल्याची मान्यता आहे. (Photo Credit : Pixabay)
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनि मकर राशीत प्रवेश करतात, त्यामुळे या दिवशी गुळाचे सेवन आणि दान केल्याने मान-सन्मान वाढतो आणि सूर्याच्या कृपेने करिअरमध्ये लाभ ही मिळू शकतो. (Photo Credit : Pixabay)
गूळ आणि तीळ यांमध्ये तापमान वाढवणारे गुणधर्म असतात. सर्दीच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी दोन्ही गोष्टी फायदेशीर मानल्या जातात. हे खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)