Health Care Tips : थंडीमध्ये स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो
हिवाळ्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. रोज अक्रोड, बदाम इत्यादी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन ए, सी, बी आणि फायबर असणारी फळे खायला हवीत. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
थंड हवामानात जास्त खाऊ नये. जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते. नाश्त्यात कर्बोदक आणि प्रथिने योग्य प्रमाणात खायला हवीत.
हिवाळ्यात अनेकजण पाणी पिणे बंद करतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यासोबतच हिवाळ्यात हर्बल टी किंवा सूपदेखील पिऊ शकता.
थंड वातावरणात पूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावेत. असे न केल्यास सर्दी, खोकला, सर्दी अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.