अंजीर आरोग्यासाठी वरदान; आजच करा आहारात समावेश
अंजीरमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्सचे पुरेश्या प्रमाणात आढळतात. अंजीर महिलांच्या अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंजीरामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अंजीरमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मिनरल कॅल्शियम असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासही मदत करत असतात.
महिलांना अनेकदा अॅनिमियाचा आजार उद्भवत असतो. अशक्तपणा असल्यास अंजीर खाऊ शकता. सुकलेल्या अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.
जर तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर अंजीर खाणे फायदेशिर ठरेल कारण यामध्ये असलेले फायबर पोट साफ करण्यास मदत करते.
अंजीरामध्ये झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि मिनरल असतात, ज्यामुळे महिलांची प्रजनन क्षमता मजबूत होते.अंजीरच्या सेवनामुळे हार्मोन्सशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही,शिवाय मेनोपॉजच्या समस्येमध्ये अंजीर खूप फायदेशीर ठरते.
अंजीरामध्ये भरपूर फायबर असते, फायबर वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी अंजीर खात असाल तर त्याच मर्यादित प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे. परंतू अंजीरामध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे वजनही वाढू शकते.
म्हातारपणी महिलांना हाडे आणि सांधेदुखीचा त्रास होतो. अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते,त्यामुळे हाडे मजबूत होतात.
रोज रात्री अंजीर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसर्या दिवशी सकाळी ते पाण्यासोबत चावून खा. असं करणं आरोग्यासाठी फादेशिर ठरेल.
तुम्हाला जर वारंवार अल्सरचा त्रास जाणवत असेल तर अंजीर खाणे फायदेशिर ठरते.