Sumangalam Lokotsav: पंचमहाभूत लोकोत्सवात स्टाॅल्सची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पाहणी
सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ' सुमंगलम् पंचमहाभूत ' या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहसूल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दीप प्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून या दोघांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला दोघा मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला.
हवामान बदलाचे परिणाम, कारणे व उपाय या अनुषंगाने या स्टॉलवर माहिती देण्यात येते.
तर महसूल विभागाच्या स्टॉलवर विविध दाखले, फेरफार, नोंदणी आदींची सविस्तर माहिती या ठिकाणी नागरिकांकरिता उपलब्ध आहे.
या स्टॉलच्या उभारणीबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.
पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या 'पंचमहाभूत बोध' या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.
यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी 'पंचमहाभूत संरक्षणाची शपथ' उपस्थितांना दिली.
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या या प्रयोगाचे (कलाकृती) मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 50 कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.
पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्व, त्यांच्यावर होत असलेले अपायकारक परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश 'पंचमहाभूत बोध' प्रयोगातून देण्यात आला.