कच्ची केळी खाण्याचे फायदे...
Health Benefits Of Raw Banana: आपल्याला दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे माहित आहेत. मात्र कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे अनेकांना कदाचित माहित नसावं. ही कच्ची केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते.
1) वजन घटवण्यास मदत- वजन घटवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे केळी खाणं टाळतात. मात्र कच्ची खेळी खाल्ल्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. कच्चं केळ हा तंतूमय पदार्थांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यामुळे अनावश्यक फॅट आणि शरीरातील अशुद्धी स्वच्छ होण्यास मदत मिळते.
2) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती- कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं.
3) भूख नियंत्रित करते - कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित करणं, शांत करण्यास मदत मिळते. वेळी-अवेळी भूक लागत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे जंक फूड किंवा फास्ट फूडकडे आपण वळत नाही. 4) मधुमेहावर नियंत्रण मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
4) मधुमेहावर नियंत्रण मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
5) पचनक्रिया सुधारते कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या तेलामुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.