आरोग्यदायी कर्टुले, जाणून घ्या कर्टुल्याचे फायदे
'कर्टुले' ही भाजी विशेषत:पावसाळ्यात येते. याला इंग्लिशमध्ये स्पायनी गॉर्ड असं म्हटलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिरव्या रंगाच्या या अंडाकार भाजीत व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबरसारखे अनेक आवश्यक पोषकत्त्व असतात. या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच सोबतच शरीराचं पोषण करण्यास मदत होते.
कर्टुल्याची चव काहीशी कडवट असते. कर्टुल्यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असतं, जे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं.
या भाजीतील रस पिंपल्स आणि एक्झिमा ठीक करण्यासाठी वापरला जातो. कर्टुल्याच्या बिया भाजून खाण्याचा सल्ला देखील तज्ज्ञ देतात.
कर्टुल्यामध्ये फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
आयुर्वेदानुसार या भाजीचा वापर मज्जासंस्थेच्या रोगांवर उपचार म्हणून केला जातो.
या भाजीत कॅलरीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे कर्टुले वेट लॉस जर्नीमध्ये फायदेशीर ठरतं.
कर्टुल्यामध्ये फायबर असतं. ही भाजी खाल्ल्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
ही भाजी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळतो.