Hair Loss :केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी आहारात करा या भाज्यांचा समावेश !
हिवाळ्यात केसांची अवस्था खराब असते, त्यामुळे यासाठी हवामानाला पूर्णपणे दोष देणे योग्य नाही. केसांशी संबंधित समस्यांसाठी त्वचेची काळजी न घेणे आणि अस्वास्थ्यकर आहार देखील जबाबदार आहे. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यामुळे प्रत्येक ऋतूत केसांचे विघटन सुरू राहते, तसेच कोंडा पाठलाग सोडत नाही आणि केसांमध्ये एका वेगळ्या प्रकारचा रुक्षपणा येतो, त्यामुळे या सर्व समस्यांवर एकत्रितपणे मात करण्यासाठी आपण आपल्या आहारात या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. (Photo Credit : pexels )
रताळे बीटा कॅरोटीनचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. आहारात त्याचा समावेश केल्यास केस गळण्याची समस्या बऱ्याच अंशी आटोक्यात येऊ शकते. त्याचबरोबर त्याचे अँटीफंगल गुणधर्म टाळूला संसर्गापासून वाचवतात. तसेच जीवनसत्त्व ए चे प्रमाण केसांना निरोगी आणि गुळगुळीत बनवते.(Photo Credit : pexels )
आरोग्य, त्वचा तसेच केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बीट खूप प्रभावी आहे. यात आढळणारे लाइकोपीन टाळूचा कोरडेपणा दूर करते. तसेच, कॅरोटीनोईड्सच्या उपस्थितीमुळे केसांची मुळे मजबूत होतात, ज्यामुळे केस तुटणे कमी होते. (Photo Credit : pexels )
आल्यामध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म टाळूचा संसर्ग आणि कोंडा यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात. कोंडा केसांचे रोम अवरोधित करतो, जे केस गळण्याचे एक प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त ते ऑक्सिडेटिव्ह ताण देखील कमी करतात, ज्यामुळे केसांचा पोत सुधारतो.(Photo Credit : pexels )
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या येतात. पालक, आणि मेथी सारख्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्व बी आणि जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते आणि पालकमध्ये देखील लोहाचे प्रमाण चांगले असते. लोहाच्या कमतरतेमुळे केस गळतात. तसेच ऑक्सिजन आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे केस निरोगी आणि मजबूत करायचे असतील तर हिरव्या भाज्यांचे सेवन सुरू करा. (Photo Credit : pexels )
गाजरामध्ये जीवनसत्त्व बी 7 असते जे बायोटिन म्हणून देखील ओळखले जाते. त्याच्या कमतरतेमुळे केस गळणे, नखे तुटणे अशा समस्या दिसून येतात. केसांचा पोत सुधारायचा असेल, त्यांची वाढ आणि प्रमाण वाढवायचे असेल तर आपल्या आहारात गाजरांचा समावेश करा. गाजरव्यतिरिक्त केळी, अंडी आणि दुधातही हे जीवनसत्व असते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )