हाडे निरोगी ठेवण्यापासून चमकदार त्वचेपर्यंत, जाणून घ्या हिरव्या बीन्सचे फायदे!
हिरव्या बीन्स पौष्टिक भाज्यांपैकी एक आहेत. सामान्यत: हिरव्या बीन्स, स्ट्रिंग बीन्स, फ्रेंच बीन्स किंवा स्नॅप बीन्सचे बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असतात. तसेच हिरव्या बीन्स या कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिरव्या बीन्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ते खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
हिरव्या बीन्समध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने अशक्तपणा, थकवा या समस्या दूर होतो . हिरव्या बीन्स खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. याशिवाय चयापचय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या बीन्सचा समावेश करू शकता.
हिरव्या बीन्समध्ये व्हिटॅमिन-के मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही अनेकदा सांधेदुखीने त्रस्त असाल तर ग्रीन बीन्स तुमच्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतात.
हिरव्या बीन्समध्ये कॅल्शियम आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. फ्लेव्होनॉइड्स हे पॉलीफेनोलिक अँटीऑक्सिडंट्स आहेत जे सामान्यत: फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात. हिरव्या बीन्स खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यास चालना मिळते.
कॅरोटीनोईड्सने समृद्ध हिरव्या बीन्स हे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील, तर तुमच्या आहारात हिरव्या बीन्सचा समावेश करू शकता .
पौष्टिक समृद्ध हिरव्या बीन्स त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत, शिवाय नखे मजबूत करण्यास देखील उपयुक्त आहेत.
त्यामुळे तुम्ही हिरव्या बीन्स नियमित खाल्ले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.