Foot Massage: मेंदू आणि हृदयापर्यंत सर्व समस्यांवर सोपा उपाय, दररोज करा पायांची मालिश
दिवसभर धावपळ करुन आपल्याला मानसिक (Mental Health) आणि शारीरिक (Physical Health) थकवा येतो. ( PC : istock )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेषत: पाय जास्त दुखतात. पायाच्या तळव्यामध्ये देखील वेदना जाणवतात. अशावेळी अनेकदा लोक कोमट पाण्याने पाय शेकतात किंवा हिटिंग पॅड वापरतात. यामुळे काही वेळ आराम मिळतो. ( PC : istock )
पाय दुखीमुळे थकवा जाणवतो. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे फायदेशीर ठरू शकते. ( PC : istock )
पायांना आणि तळव्यांना रोज मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे तणाव दूर होऊन चांगली झोप येते आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो. ( PC : istock )
पायांच्या तळव्याला मसाज करणे देखील आयुर्वेदात फायदेशीर मानले गेले आहे. पायांची मालिश करण्याचे फायदे जाणून घ्या. ( PC : istock )
जर तुम्हाला निद्रानाशाची तक्रार असेल आणि रात्री नीट झोप येत नसेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ( PC : istock )
दररोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मसाज करा. यामुळे थकवा दूर होईल आणि तणाव कमी होईल. यामुळे चांगली झोप येईल. ( PC : istock )
सध्या अनेकांना नैराश्य आणि तणावाची तक्रार असते. दीर्घकाळ तणावामुळे नैराश्य येऊ शकते. मन शांत ठेवण्यासाठी पायाच्या तळव्याची मालिश करावी. त्यामुळे तणाव कमी होऊन मानसिक शांती मिळते. ( PC : istock )
पायांना आणि तळव्यांना मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तळव्यांना मसाज केल्याने संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे त्वचेवर देखील तेज येते. ( PC : istock )