Kairiche Panhe Recipe: ऋतू संपण्याआधी घरच्या घरी बनवा कैरीचं आंबट-गोड पन्हं; उन्हाच्या काहिलीपासून मिळेल आराम
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे, अशा स्थितीत उष्माघातापासून वाचण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या नैसर्गिक पेयांचे सेवन करतात. यापैकी कैरीचे पन्हे अनेकजण आवडीने पितात, यामुळे उष्माघातापासून दूर राहण्यास मदत होते. हे थंडगार पन्हे कसे बनवायचे हे पाहूया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकैरीचं पन्हं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 5 मध्यम आकाराच्या कैऱ्या, पुदिन्याची 7-8 ताजी पानं, अर्धा चमचा जिरे पावडर, 200 ग्रॅम साखर, 1 चमचा काळे मीठ, चवीनुसार पांढरे मीठ, बर्फाचे तुकडे (आवश्यकतेनुसार)
कैरीचे पन्हे बनवण्यासाठी सर्वप्रथम कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
यानंतर कुकरमध्ये एक ग्लास पाणी घाला आणि कैऱ्या कुकरमध्ये ठेवा. कुकरची एक शिट्टी होऊ द्या.
कुकरची हवा गेल्यानंतर तो उघडा आणि एका प्लेटमध्ये कैऱ्या काढून घ्या आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा.
कैऱ्या थंड झाल्यानंतर त्यांचे साल काढा आणि कैरीचा संपूर्ण गर काढा. कोय बाजूला ठेवा.
एक मिक्सर जारमध्ये कैरीचा गर काढून घ्या आणि त्यात जिरे पूड, काळे मीठ, पांढरे मीठ, साखर आणि पुदिन्याची पानं घाला.
यात 4 ते 5 बर्फाचे तुकडे घाला आणि थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. मिश्रण चांगलं मिक्स झालं की गाळून सर्व्ह करा.
ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला. थोडे काळे मीठ शिंपडा आणि चमच्याने मिसळा. यामुळे कैरीच्या पन्ह्याला उत्तम चव येईल.