Sweet Potato Balls: संध्याकाळच्या चहासोबत स्वादिष्ट क्रिस्पी स्वीट पोटॅटो बॉल; रेसिपी बनवायला खूप सोपी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2023 07:47 PM (IST)
1
हिवाळ्यात रताळे खाणे खूप चांगले असते. पण आज आम्ही तुम्हाला रताळ्याचे क्रिस्पी बॉल्स कसे बनवायचे ते सांगणार आहोत. संध्याकाळी नाश्त्याला टोमॅटो केचप, मायो सोबत तुम्ही हे खाऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रताळे चांगले धुवून उकळून घ्या. ते मऊ होईपर्यंत शिजू द्या.
3
नंतर रताळे सोलून ते चांगले मॅश करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी पावडर आणि मैदा घाला. मिश्रण चांगले मिसळा आणि कडक पीठ तयार करा.
4
एका भांड्यात त्याचे गोळे तयार करा. गोळे ब्रेडक्रंब्स मध्ये बुडवून गरम तेलात तळून घ्या. सोनेरी होईपर्यंत तळा.
5
तळल्यावर रताळ्याचे गोळे केचप, पुदिन्याची चटणी किंवा मेयोसोबत सर्व्ह करा.