Share Market Closing Bell शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फटका
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज चौफेर नफावसुली झाली. या नफावसुलीमुळे बाजारात घसरण दिसून आली.
Share Market Closing Bell शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फटका
1/9
शेअर बाजारात मागील दोन दिवस खरेदीचा जोर दिसल्यानंतर आज विक्रीचा जोर दिसून आला.
2/9
सेन्सेक्स 285 अंकांच्या घसरणीसह 63 238 अंकांवर स्थिरावला. निर्देशांकातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली.
3/9
निफ्टी निर्देशांकात 86 अंकाच्या घसरणीसह 18,771 अंकावर बंद झाला. निफ्टी 50 पैकी 39 कंपन्यांत घसरण झाली.
4/9
बँकिंग, आयटी, एफएमसीजी, फार्मा, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.
5/9
मेटल्स आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये तेजी दिसून आली.
6/9
मिड कॅप इंडेक्स, स्मॉल कॅपमध्येही घसरण झाली. मिडकॅप निर्देशांकात 380 अंकांची घसरण दिसून आली.
7/9
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
8/9
दिवसभरातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 2.05 लाख कोटींचा फटका बसला
9/9
बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 292.30 लाख कोटी रुपयांवर आले.
Published at : 22 Jun 2023 05:33 PM (IST)