Chicken Masala Fry Recipe: नॉनव्हेजचे शौकीन आहात? मग ही चटकदार चिकन फ्राय रेसिपी नक्की ट्राय करा
सर्वप्रथम चिकन नीट धुवून घ्या आणि त्यानंतर चिकनला मॅरिनेट करा. चिकन फ्राय बनवण्यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील मसाल्यांची आवश्यकता असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, आले-लसूण पेस्ट आणि थोडे दही घालून आणि लिंबू पिळून चिकनला थोडा वेळ मॅरिनेट करा. हे सर्व मसाले चिकनला नीट लावल्यास चिकन फ्रायची चव वाढेल.
जर तुम्हाला चिकन अजून चविष्ट बनवायचे असेल. तर तुम्ही मॅरिनेशन दरम्यान त्यात 2-3 मिरच्या आणि मूठभर कोथिंबिर मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवू शकता आणि ही पेस्ट तुम्ही चिकनला लावून ठेवा.
आता काही तास चिकन मॅरिनेट झाल्यानंतर कढईत किंवा तव्यात तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात एक-एक चिकनचे तुकडे पसरवून ठेवा.
सोनेरी रंग येईपर्यंत आणि थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत चिकनचे तुकडे दोन्ही बाजून तळून घ्या.
तुमची डिश आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. थोड्या हिरव्या चटणीबरोबर नाश्ता म्हणून किंवा जेवणावेळी स्टार्टर म्हणून ही डिश तुम्ही सर्व्ह करू शकता.