Cyclone Biparjoy : चक्रीवादळाचा वाढता धोका! 48 तासांत भारताच्या किनाऱ्यावर धडकणार बिपरजॉय
बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) सुमारे 48 तासांनी भारतातील गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची येथील किनारपट्टी धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका गुजरात किनारपट्टीला असल्याचं बोललं जात आहे. यामुळे मांडवी, पोरंबदर आणि कच्छ तसेच इतर किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ धडकण्याआधी गुजरातमध्ये हवामानात मोठा बदल झाला आहे. सोसाट्यानं वादळी वारे वाहत असून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना सुरु असून किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं काम सुरु आहे.
गुजरात किनारपट्टी भागातील शाळा आणि बंदरे बंद करण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये अनेक ट्रेनही रद्द करण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळ तयार झालं. हे चक्रीवादळ मोखा नंतरचं सर्वात शक्तीशाली वादळ असल्याचं सांगितलं जातं आहे.
'मोखा' चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं होतं. बिपरजॉय चक्रीवादळाची अत्यंत तीव्र श्रेणीमध्ये नोंद करण्यात आली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून 67 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची स्थापना केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची स्थापना केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ अनिल कुमार लाहोटी आणि इतर बोर्ड सदस्य परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी हे चक्रीवादळ 125 ते 135 किमी प्रतितास वेगाने गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता आहे.