Kolhapur Railway Station : कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे रुपडे पालटणार; अशी असेल नवीन झलक
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 43 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योजनेतील देशभरातील कामांचे भूमिपूजन उद्या रविवारी (6 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
मध्य रेल्वेचे पुणे विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ. रामदास भिसे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कोल्हापूर रेल्व स्थानकावर 43 कोटी 3 लाखांच्या निधीतून विकासकामे केली जाणार आहेत.
अमृत भारत विकास योजनेतून पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कराड, सातारा, वाठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरुळी, कडगाव, बारामती आणि फलटण या स्थानकांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पीएम मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भूमिपूजन होईल.
पुणे विभागातील कोल्हापूरसह 38 रेल्वे स्थानकांवर कार्यक्रम पाहता येणार आहे.
या कार्यक्रमास खासदार, आमदार, पद्मश्री पुरस्कार विजेते, स्वातंत्र्यसैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक आणि पोस्ट अधिकारी आणि शालेय मुले, स्वयंसेवी संस्था उपस्थित राहतील.
शालेय विद्यार्थ्यांसाठी येथे निबंध आणि चित्रकला स्पर्धा होतील.
यावेळी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्टेशनच्या पुनर्विकासाचे नियोजन स्वरूप दर्शविणारा व्हिडिओ दाखवला जाणार आहे.